मराठा आरक्षणासाठी चाळीसगावात ‘शोले स्टाईल’ आंदोल
कोर्टाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून सकल मराठा समाजाचा आंदोलनातून सरकारला इशारा

चाळीसगाव, / सप्त नगरी न्यूज ब्युरो दि. १३ सप्टेंबर :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चाळीसगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील कोर्टाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलकांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन करत मराठा आरक्षणाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.

रविवारी (दि. १३ सप्टेंबर) सकाळी सुमारे १० वाजता हे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी यापूर्वीही राज्यभर विविध आंदोलने व मोर्चे झाल्याचे आंदोलकांनी सांगितले. शासनाकडून ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मनोज जरांगे-पाटील यांनी दिलेल्या ‘मुंबई चलो’च्या आवाहनालाही आंदोलनकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांतून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
या आंदोलनात गणेश पवार, प्रशांत गायकवाड, तमाल देशमुख, दिलीप पाटील, पप्पू पाटील, अरुण पाटील, दगाजी गुंजाळ, रमेश गोल्हार, माणिक गुंजाळ, अरुण गायकवाड, राजेंद्र पाटील, प्रदीप मराठे, गोकुळ पाटील, नाना शिंदे, बंडू पाटील, जनार्दन महाडिक, संदीप पाटील, नंदकिशोर जाधव, केशव पाटील, अनिल शिंदे, दीपक पाटील, रविंद्र मोरे, मुकुंद पवार, प्रमोद वाघ, सचिन गायकवाड, स्वप्निल राखुंडे, बबलू गायकवाड, विक्की शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.
तसेच महिला भगिनींसह चाळीसगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मागणीवर शासनाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
- 0
- 0
- 0
- 0





