
वीर सावरकर जयंती निमित्त तळोदा येथे भारत माता पूजन व बौद्धिक कार्यक्रम संपन्न
तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
विश्व हिंदू परिषद साप्ताहिक सत्संग मंडळ तर्फे तळोदा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित बौद्धिक कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून धुळे विभाग समरसता प्रमुख अॅड. किशोर चव्हाण, यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. सावरकर हे राष्ट्रभक्ती, समाजजागृती आणि हिंदुत्व विचारांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शांतीलाल पिंपळे, विश्व हिंदू परिषद जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री राजेश चौधरी, विशेष संपर्क जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांनी केले.
कार्यक्रमास विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत विशेष संपर्क सहप्रमुख विजयराव सोनवणे, सत्संग प्रमुख मोहन भैय्या रघुवंशी, गोरक्षक अनुराग सक्सेना, कीर्ती कुमार माळी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मुकेश जैन, आशिष मराठी तसेच अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
- 0
- 0
- 0
- 0





