नंदुरबार

जयनगर पोस्टचे डाखपाल अविनाश महाजन यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरव

­

जयनगर पोस्टचे डाखपाल अविनाश महाजन यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरव

शहादा: सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
शहादा उपविभागात जयनगर डाकघर शाखेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शाखा डाखपाल अविनाश भाऊराव महाजन यांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शहादा डाकघर पोस्ट उपविभागात जयनगर डाकघर शाखे अंतर्गत जे नगर, निंभोरे, धांद्रे गावातून पोस्ट खात्यात अविनाश भाऊराव महाजन यांनी सन 2025 – 26 या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी केली.

पोस्ट विभागाच्या शहादा येथे एका कार्यक्रमात अविनाश भाऊराव महाजन यांना धुळे डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक संजय ताठे यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात करण्यात आला. हा सन्मान केवळ माझा नसून जय नगर, निंभोरे, धांद्रे या गावातील सर्व ग्रामस्थांचा आहे. असे अविनाश महाजन यांनी सांगितले.

  • 0
  • 1
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *