नंदुरबार

आदिवासी भिल्ल समाजा च्यावतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम; उनपदेव येथे आदिवासी भिल्ल समाजाच्या मेळावा

आदिवासी भिल्ल समाजा च्यावतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम…

उनपदेव येथे आदिवासी भिल्ल समाजाच्या मेळावा

शहादा तालुक्यातील उनपदेव या ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजाच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विविध शैक्षणिक सांस्कृतिक व वनौषधी वनस्पती यावर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दरा गावाचे सरपंच वसंतीबाई राहसे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून व वृक्ष लागवड करून उद्घाटन करण्यात आले.


यावेळी प्रा डॉ. खुमानसिंग वळवी, प्राध्यापक ए. एम.वळवी, विजय महाले, सुदाम वळवी, सुभाष पाडवी, किरण ठाकरे, मंगेश बर्डे, उदय वळवी, सुरजीत ठाकरे यां मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. उनपदेव या ठिकाणी वन विभाग व आदिवासी भिल समाजाच्या संयुक्त विद्यमानाने विविध वृक्षांची लागवड करून वृक्ष संवर्धन करण्याची स्थानिक लोकांनी ग्वाही दिली.

यानंतर कार्यक्रमात सामाज हित, समाजाची संस्कृती, समाजाची विविध अंगाने शैक्षणिक प्रगती घडून आणण्याच्या संदर्भात मान्यवरांनी चर्चा करून मार्गदर्शन केले.

आदिवासी भिल्ल समाज कर्मचारी संघ शहादा तालुकाध्यक्ष पदी प्रा. ए. एम. वळवी यांची एकमताने निवड


यावेळी आदिवासी भिल्ल कर्मचारी संघाची स्थापना करण्यात आली. शहादा तालुका अध्यक्ष म्हणून वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्रा ए एम वळवी यांची एकमताने निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी ही काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी शहादा तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप ठाकरे यांनी तर आभार मनोहर नाईक यांनी केले

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *