नंदुरबार

स्वातंत्र्य प्राप्ती नंतर प्रथमच रापापुर गावात एस.टी.बस दाखल; ग्रामस्थांमध्ये आनंद

स्वातंत्र्य प्राप्ती नंतर प्रथमच रापापुर गावात एस.टी.बस दाखल; ग्रामस्थांमध्ये आनंद

तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
तळोदा तालुक्यातील रापापुर गावात भारताला स्वातंत्र्य प्राप्ती नंतर प्रथमच महाराष्ट्र शासनाची बस दाखल झाली. त्यात आमदार राजेश पाडवी व ग्रुप ग्राम पंचायत रापापुरचे लोकनियुक्त सरपंच सौ. प्रितीमा विक्रम वळवी तसेच शेठ . के . डी. हायस्कूल च्या शिक्षक व रापापुर गावातील गावकऱ्यांच्या विशेष प्रयत्नाने आज आमच्या गावाला बस सेवा सुरू झाली आहे.

 

या वेळेस सरपंच सौ. प्रितीमा विक्रम वळवी, उपसरपंच मेथून पाडवी, माजी . सरपंच भिकलाल वळवी, विक्रम वळवी, हरिचंद्र ठाकरे ग्रा .पं सदस्य वसंत वळवी, गोविंद पाडवी, गोपिसिंग वसावे, कु . पारुणा वळवी, सौ . कमिला ठाकरे, सौ . फुलवंती वळवी, सौ . मोगी बाई वळवी तसेच अमरसिंग (महाराज)

रामसिंग ठाकरे, भिमसिंग वळवी, मोतीराम वळवी, कोच ऱ्या वळवी, बाबु कोठारी कु.कैलास वळवी श्री कृष्णा वळवी जाम सिंग ठाकरे सिताराम वळवी लालसिंग वळवी दरबारसिंग ठाकरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . तसेच आमदार राजेश पाडवी यांचे स्वीय सहाय किरण सुर्यवंशी आगार व्यवस्थापक किशोर आहिरराव वाहतुक निरीक्षक अजिंक्य नाकर यांचे सरपंच उपसरपंच व ग्रा पं सदस्य व गावकऱ्यांनी आभार मानले .

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *