तळोदा तालुक्यात सरासरी 24.5 मिमी पावसाची नोंद आज पावसाने दिली ओढ
तळोदा तालुक्यात गेल्या चोवीस तासात झालेल्या सततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तळोदा तालुक्यात सरासरी 24.5 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कमी झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सर्वत्र जलमय झाले होते. शनिवारी झालेल्या पावसाची सकाळी आठ पर्यंत तळोदा तालुक्यात आज सरासरी 24.5 मिमी नोंद झाली आहे. तळोदा मंडळात 21 मिमी, बोरद मंडळात 7 मिमी, सोमावल मंडळात 56 मिमी, प्रतापपूर मंडळात 14 मिमी पावसाची नोंद झाली तळोदा तालुक्यात आज अखेर एकूण वर्षीक सरासरी 333.25 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आज रविवारी पावसाने उघडीप दिली आहे.
- 1
- 0
- 0
- 0






