नंदुरबार

नंदुरबार-धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव व कर्मचारी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

नंदुरबार-धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव व कर्मचारी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

   नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-        नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळातर्फे गुरुकुल नगर येथील समाजाचे मंगल कार्यालय, लिंबाई भवन येथे विद्यार्थी गुणगौरव व कर्मचारी सेवानिवृत्त सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त नायब तहसीलदार पांडुरंग महादु मराठे होते. प्रमुख वक्ते म्हणून किरण काळे आणि डॉ. महेश बोराणे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग गायकवाड आणि पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांची उपस्थिती होती.

मान्यवरांची उपस्थिती
व्यासपीठावर नंदुरबारचे नगरसेवक दिपकभाऊ दिघे, रविंद्रभाऊ पवार, निताताई मराठे, शहाद्याचे नगरसेवक सागरभाऊ बोराणे, भावनाताई कदम, दोंडाईचाचे नगरसेवक भारतीताई मराठे, विजयभाऊ मराठे, सुरत येथील मराठा कल्याण ट्रस्टचे माजी अध्यक्ष मनोजबापु पवार, शांतीलाल गायकवाड, डॉ. विजयाताई गायकवाड, पुरुषोत्तम चव्हाण, बारीकराव बोराणे, ब्रिजलाल चव्हाण यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

145 विद्यार्थी आणि 32 कर्मचाऱ्यांचा सन्मान
या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 145 विद्यार्थ्यांचा, विविध क्षेत्रातील 8 पुरस्कार प्राप्त बांधवांचा, 11 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा, 6 पदोन्नती प्राप्त आणि 7 नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, ट्रॉफी आणि शाल-पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

आयोजक आणि उपस्थिती
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सचिव अनिल वायकर, सहसचिव डॉ. संजयराव उगले, संचालक लक्ष्मणभाऊ कदम, प्रल्हादआप्पा मराठे, जितेंद्रभाऊ खांडवे, नवनितभाऊ शिंदे, किरणराव दाभाडे, महेंद्रभाऊ गाडे, चुडामन बोराणे, शामकांतभाऊ सोमवंशी, संजयभाऊ बोराणे, हरीशराव हराळे, पुष्पाताई बोराणे, युवा अध्यक्ष भूषण चव्हाण, युवा उपाध्यक्ष राजेंद्र भवर, अजिंक्य गायकवाड,लक्ष्मणराव मोरे, सुनील चव्हाण, चंद्रकांत बोराणे, भटूभाऊ बोराणे, पमनभाऊ बोराणे, संतोष मिरगे, पत्रकार सुरेश पवार, आनंद पवार तळोदा तालुका अध्यक्ष सुभाषभाऊ शिंदे युवा सदस्य राजू मोगल, सुनिल गांगुर्डे, दिगंबर चव्हाण, राकेश तनपुरे, वैभव चव्हाण, जिग्नेश मराठे, मयुर चव्हाण, राहुल शिंदे आदीसह अनेक युवा सदस्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अनिल वायकर यांनी केले. सूत्रसंचलन किरणराव दाभाडे आणि चंद्रकांत बोराणे यांनी केले, तर आभार जितेंद्रभाऊ खांडवे यांनी मानले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव, भगिनी, युवक, युवती उपस्थित होते.

­

  • 1
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *