आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न.
शिबिरात ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले
तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा आर्मी संघटनेने आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नरेश पाडवी यांच्या हस्ते उदघाट्न झाले.यावेळी डॉ.पाडवी म्हणाले की,जिल्ह्यात सिकलसेल व गरोदर मातांना रक्ताची खूप गरज असते.आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.बिरसा आर्मीच्या हा स्तुत्य उपक्रम आहे.तरुण पिढीने शिक्षणाबद्दल व आरोग्य जाणून व्यसनापासून दूर राहून आरोग्य जपले पाहिजे.डॉ.महेंद्र चव्हाण जिल्हा क्षयरोग अधिकारी आपल्या मनोगतात म्हणाले,रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे.असेच सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे.असे मत व्यक्त केले.तर योगेश्वर पाडवी महावितरण व्यवस्थापक यांनी रक्त हे कृत्रिम तयार करता येत नाही. निसर्गनियमानुसार मानवच रक्तदान करून इतरांना जीवनदान देऊ शकतो.असे व्यक्त केले.
संघटनेचा कार्यकर्त्यांसह परिसरातील ३९ रक्तदात्यांना रक्तदान केले.सर्व रक्तदात्यांना बिरसा आर्मीचे टी-शर्ट व प्रमाणपत्र देण्यात आले.नंदुरबार सिव्हिलचे डॉ.हर्षा मोरे,डॉ.गीता गाभुड,किरण मोरे,ईश्वर वसावे व त्यांची टीम उपस्थित राहून सहकार्य लाभले.यावेळी बिरसा आर्मीचे जिल्हाध्यक्ष भरत पावरा,सचिव सतीश पाडवी,धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी, नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,तळोदा तालुकाध्यक्ष देविसिंग वळवी,कार्याध्यक्ष हिरालाल पावरा,कालूसिंग पावरा,सुभाष पाडवी,दिनेश वसावे,तापसिंग पाडवी,कुवरसिंग पराडके,मुकेश कापुरे,योगेश पाडवी,हंसराज महाले,मंगल पाडवी,गुलाबसिंग पाडवी,संजय पाडवी,प्रकाश नाईक मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले तर यशवंत वळवी यांना सूत्रसंचालन करून आभार मानले.
- 0
- 0
- 0
- 0







