अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड जाहीर

कळंब /प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दि.19 जुलै 2026 रोजी कळंब पत्रकार भवन येथे पत्रकारांची एक व्यापक बैठक घेऊन या बैठकीमध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कळंब तालुका अध्यक्षपदी अमर भारत चोंदे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
तर उपाध्यक्षपदी श्रीकांत बरकते,कार्याध्यक्षपदी सुधाकर माणिकराव रणदिवे,सचिवपदी राहुल गोरख गाडे,संघटकपदी शिवप्रसाद बियाणे,सहसंघटकपदी अविनाश जाधव,
कोषाध्यक्षपदी शिवाजी बोबडे,सहसचिवपदी दिलीप झोरी,प्रसिद्धी प्रमुख म्हणून किरण राजपूत,सहसंघटकपदी अझहर शेख, अविनाश जाधव आणि सल्लागारपदी ॲड.मंदार मुळीक या सर्वांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना सत्कार करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी डिजिटल मीडिया परिषद प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य सदस्य, अनिल वाघमारे, सुधाकर पोटभरे, व धाराशिव जिल्हाध्यक्ष रहीम शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ध्येय धोरणे या प्रसंगी उपस्थित पत्रकार बांधवांसमोर मांडली. बैठकीस कळंब तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार माधव सिंग राजपूत यांनी केले.
_______________________________
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख सर यांनी कळंब येथील बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांसोबत व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला.
________________________________
- 0
- 0
- 0
- 0





