
प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्र इमारतीचे नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते नंदुरबारात शानदार भूमिपूजन
नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान संचलित भव्य ओम शांती केंद्राचे गुरुवार 5 मार्च रोजी शानदार भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
शहरातील जिजामाता महाविद्यालया मागील शिक्षक कॉलनीत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय केंद्र उभारण्यात येणार आहे. या आध्यात्मिक केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा माउंट आबू राजस्थान येथील बीके रुपेशभाई, नंदुरबार नगर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी, यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी म्हणाल्या की, दैनंदिन जीवनात ईश्वराचे चिंतन ठेवून ईश्वरा प्रति सद्भावना राखावी, फळाची अपेक्षा न ठेवता फळ मिळत राहील. शिवबाबा सर्वांना संकटातून बाहेर काढतात. उद्याच्या भविष्याची चिंता करू नका. वर्तमान काळात आनंदी राहून जीवन व्यतीत करण्याचे आवाहन रघुवंशी यांनी केले.
माउंट आबू राजस्थान येथून आलेले बीके रुपेश भाई यांनी सांगितले की, आपले जीवन पवित्र करण्यास प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवारात सामील व्हावे. नंदुरबार येथील पावन धाम ईश्वराचे धाम तयार होईल जिथे पवित्र पावन सुख शांती आहे पवित्रता मध्येच सुख आहे परमात्म्याचे घर लवकरात लवकर पूर्ण होऊन नंदुरबार जिल्ह्यात नावलौकिक होईल असेही ते म्हणाले.
यावेळी नंदुरबार नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, साक्री केंद्राच्या संचालिका बीके शिलादीदी, शहादा केंद्राच्या संचालिका बीके विद्या दीदी, नगरसेविका भावना पटेल, टीना ठाकूर, नगरसेवक दीपक कटारिया, राऊ मोरे, हिरालाल चौधरी, पंकज चौधरी, मोहन खानवाणी, कमल ठाकूर, शत्रुघ्न बालानी, समिधा नटावदकर, डॉ. तेजल चौधरी, उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे, तहसीलदार प्रदीप पवार, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावना नंदुरबार केंद्राच्या प्रमुख बीके योगिता दीदी यांनी केले. सूत्रसंचालन बीके विवेकभाई यांनी केले. आभार मीडिया समन्वयक महादू हिरणवाळे यांनी मानले.
भूमिपूजन सोहळा यशस्वीतेसाठी नंदुरबार आणि शहादा केंद्रातील सर्व साधकांनी परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





