नंदुरबार शहरात २४ हजार रुपये किमतीच्या ७ धारदार तलवारी जप्त…
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;

नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबारच्या पथकाने शहरातील चिराग गल्ली परिसरात कारवाई करत अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्या इसमाकडून एकूण ७ धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारींची अंदाजे किंमत २४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अदनान खान सफदर खान पठाण (वय ३०, रा. चिरागगल्ली, नंदुरबार) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ७ वाजता चिराग गल्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपीच्या राहत्या घराच्या छतावर, लपवून ठेवलेल्या ७ धारदार लोखंडी तलवारी पोलिसांना आढळून आल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. या कारवाईत तलवारी हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
कारवाई पथक
पोलीस निरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार पोलीस, दिनेश चित्ते , जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, मुकेश तांबे, मोहन ढमढेरे, चेतन साळवे, मनोज महाजन, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, कल्पेश मोरे, अभय राजपूत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
- 0
- 0
- 0
- 0





