नंदुरबार

राष्ट्रीय महामार्ग 752G व गोमाई पुलाच्या कामांची मा. कृष्णकांत कनवरिया (IAS) यांची पाहणी

राष्ट्रीय महामार्ग 752G व गोमाई पुलाच्या कामांची  कृष्णकांत कनवरिया (IAS) यांची पाहणी


शहादा|सप्त नगरी न्यूज ब्युरो

दि. 16 रोजी राष्ट्रीय महामार्ग 752G अंतर्गत मौजे चांदसैली येथील गट क्र. 97 मधील भूसंपादन झालेल्या क्षेत्राची उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

या भेटीदरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भूसंपादन प्रक्रियेची सद्यस्थिती, जमिनीचा ताबा, प्रलंबित बाबी तसेच पुढील कार्यवाही यांचा आढावा घेण्यात आला. कामे नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

तसेच  कृष्णकांत कनवरिया यांनी मे. सागर पोल्ट्रीफार्म येथे भेट देऊन प्रकल्पग्रस्त क्षेत्राची स्थिती व संबंधित बाबींची माहिती घेतली.

यानंतर गोमाई पुलाच्या कामांचीही पाहणी करण्यात आली. पुलाच्या बांधकामाची प्रगती, सुरक्षा उपाययोजना आणि दर्जाबाबत तपासणी करून कामात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश देण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग व पूल प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुरक्षित व सुकर वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाहणी व समन्वय करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

LandAcquisition #InfrastructureDevelopment #collectorofficenandurbar

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *