नंदुरबार महाराष्ट्र

एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा

एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा

तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्सवात साजरा करण्यात आली.


                        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक  सत्यजित नाईक हे होते. यावेळी खाटीक जरार ,राणे देवांश, राजपूत नक्ष, मणियार अफिया ,भूमी वळवी, अस्मिता कोळी ,नंदनी वसावे या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्य याविषयी मनोगत व्यक्त केले. चौथीच्या मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित गाण्यावर नृत्य सादर केले.


                         स्वयंम सराफ, सुयोग परदेशी, तन्मय नेरकर, वसावे प्रिन्स, सूर्यवंशी आदित्य या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर लिखित चारोळी व पोवाडा सादर केले. इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी पलक मराठी व हिमानी बोराडे यांनी शिव स्तुती केली. तर नूतन वाळवी या विद्यार्थिनीच्या शिवगर्जनेने उपसितांचे दाद मिळवली. राजपूत नक्ष व हिवरे नक्ष या विद्यार्थ्यांचे शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील उपस्थिती ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


                    अध्यक्षीय भाषणात नाईक सरांनी शिवाजी महाराजांचे बालपण त्यांचे सवंगडी, मावळे तसेच शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळ याबाबत माहिती सांगितली तसेच शिवाजी महाराज हे कसे जाणता राजा होते याविषयी उदाहरणासहित माहिती सांगितली.                         

                     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल पाडवी यांनी तर आभार प्रदर्शन मनीषा मगरे  यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *