
मौजे धसाडी येथे चार तराफे जाळून नष्ट
परभणी |सप्त नगरी न्यूज ब्युरो मौजे धसाडी (ता. परभणी) येथे सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर तहसील कार्यालय आणि जिल्हा खनिकर्म विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. कार्यवाही करिता पोलिस प्रशासनाने आवश्यक सर्व सहकार्य केले.या कारवाईदरम्यान, रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे चार तराफे प्रशासकीय पथकाने जागीच नष्ट करून पेटवून दिले. नदीपात्रातून होणारी रेतीची चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ही कडक कारवाई करण्यात आली आहे.

तहसील कार्यालय, परभणी यांच्या वतीने ही माहिती जाहीर करण्यात आली असून, अवैध रेती उपसा करणाऱ्यांना या कारवाईतून कडक इशारा देण्यात आला आहे.

कारवाई जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने, उपविभागीय अधिकारी परभणी, तहसीलदार परभणी यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली. कारवाई वेळी याठिकाणी नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर, राजकुमार राठोड, मंडळ अधिकारी सचिन शिंदे, संदीप बडगुजर, ग्राम महसूल अधिकारी श्री राजुरकर, श्री ढवळे, वैभव माने तसेच पोलिस प्रशासन व परभणी तहसील कार्यालयातील महसूल सेवक उपस्थित होते
- 0
- 0
- 0
- 0





