नंदुरबार

प्रशासनाच्या उदासीनतेने शेकडो गावे पोलीस पाटीलविना सात वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली. बिरसा आर्मीचे जिल्हाधिकारी व प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

प्रशासनाच्या उदासीनतेने शेकडो गावे पोलीस पाटीलविना

सात वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली.

बिरसा आर्मीचे जिल्हाधिकारी व प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सात वर्षापासून शेकोडो गावात पोलीस पाटील नाही.पोलीस पाटील भरती त्वरित राबवावी.यासाठी बिरसा आर्मीने जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी तळोदा यांना तिसरे स्मरण निवेदन दिले. याबाबत निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात गेल्या सात वर्षापासून पोलीस पाटील भरती रखडल्याने शेकोडो गावे पोलीस पाटीलविना आहे.दीड वर्षापूर्वी पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.परंतु,काही दिवसातच तोही रद्द करण्यात आला.सात वर्षापासून आहे त्या पोलीस पाटीलावरच शेजारी गावांची जबाबदारी दिली जात असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण आहे.पोलिस पाटील हा महसूल व पोलिस यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो.गाव पातळीवरील घटना,घडामोडी,तंटे,वाद गावातच सोडविण्याची व इतर महत्वाची कामे केली जातात.

तळोदा तालुक्यात अमोनी, लक्कडकोट, रापापूर, राजविहीर, धवळीविहीर, मेंढवढ, नवागाव सलसाडी, बोरद, लाखापूर, बुधवाली, राणीपुर, रांझणी, आमलाड, मोड अशा एकूण ३७ महसूली गावात अद्यापही पोलीस पाटील नाही. संघटनेमार्फत गेल्या चार वर्षापासून सतत पाठपुरावा करत असतांना देखील सरकार,प्रशासन दुर्लक्ष करतांना निदर्शनास येत आहे;हे दुर्दैव.प्रशासन एवढे उदासीन का? असा प्रश्न उपस्थित करत पोलीस पाटील पदभरती प्रक्रिया त्वरित राबविण्याची मागणी केली आहे.

निवेदनावर बिरसा आर्मीचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी,तळोदा संघटक कालूसिंग पावरा,पाल्हाबार-रापापूर शाखाध्यक्ष शिवाजी तडवी,सल्लागार गणेश पाडवी,सायसिंग वळवी,कोठ्या पावरा आदी.पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

पोलीस पाटील हा महसूल व पोलीस यांच्यातील महत्वाचा दुवा असतो.गाव पातळीवरील घटना,तंटे,वाद गावातच सोडवण्यासाठी व कायदा,सुव्यवस्था अबाधित ठेवण्याससाठी पोलीस पाटील यांची भूमिका महत्वाची असते.परंतु,जिल्ह्यात गेल्या सात वर्षांपासून संबंधित प्रशासनाच्या उदासीनता व दुर्लक्षतेमुळे शेकोडो गावे पोलीस पाटीलविना आहे;हे दुर्दैव.भरती प्रक्रिया त्वरित राबवावी’

राजेंद्र पाडवी,संस्थापक अध्यक्ष बिरसा आर्मी.

    • 0
    • 0
    • 0
    • 0

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *