नंदुरबार

‘जीवन परिक्रमा’ आत्ममंथनातून स्वतःचा शोध! – साहित्यिक व कवी, जनप्रेरक सतीश वळवी

‘जीवन परिक्रमा’ – आत्ममंथनातून स्वतःचा शोध!

साहित्यिक व कवी, जनप्रेरक सतीश वळवी लिखित ‘जीवन परिक्रमा’ ही कविता मानवी अस्तित्व, नैतिकता आणि अंतर्मनातील माणसाचा शोध घेणारी चिंतनशील रचना आहे. आयुष्याच्या प्रवासात भरकटताना हरवलेली मूल्ये, विसरलेली नैतिकता आणि स्वतःपासून दूर गेलेल्या माणसाची जाणीव करून देणारी ही कविता आत्मपरीक्षणाचा संदेश देते. ‘मी म्हणजे कोण?’ आणि ‘माझ्यातला माणूस कुठे हरवला?’ या प्रश्नांच्या माध्यमातून वाचकाला स्वतःच्या अंतरंगात डोकावण्यास प्रवृत्त करणारी ही रचना म्हणजे जीवनाचा अर्थ शोधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

जिवन परिक्रमा

मी एक मनुष्य‌प्राणी अंतरीक्षयानातुनी
अधांतरीत जिवन जगत असुनी
भटकंतीच्या वाटेवरी चुकुनी भटकत राहूनी
आयुष्यमान काळाचा भूतकाळ विसरूनी
भविष्य हरवून चुकलो माझ्या जिवनातुनी
वर्तमान काळात गुदमरूणी उठलो अंतकरणापासुनी
तत्व-मत्व-सत्व काय जाणिव न करीता जिवन संपवुनी
अजाण होऊनी, आपलं समजूनी, घात सोसुनी
ताट मान करूनी, जागं आली मजला नयनी
स्वतः समजुनी- सांभाळूनी- अन सुधरवून उठुनी
जाणं आली, मजला मी कोण स्वतः ला जाणुनी
माझ्यालला माणूस दूर जाऊनी कुठं रूसुनी बसला
नियतीचे नेम विसरूनी, नैयतीकता नाय पाळूनी
शेवटी जिवन परिक्रमाचा अंत करूनी
चाललो मी जग सोडुनी तुमच्या पासुनी
देवाच्या दारी पोहचुनी जय आदि‌वासी म्ह‌णुनी
सांकेतिक प्रश्न उदभवतोय मजला

•मी म्हणजे कोण ?
• मी आणि माझ्यातला माणुस या मधले अंतर किती ?
• मी आणि माझ्यातली नैतिकता हिचे मुल्यमापन किती ?
आत्ममंथन-आत्मकथन.आत्मजतन-आत्मचिंतन- आत्मनिरिक्षण
आत्मपरिक्षण होऊनी समज दे मजला
हे परमेश्वरा
जनप्रेरक
सतिश वळवी
संपर्क- ८३९०५४१५५५

जनप्रेरक सतिश वळवी
साहित्यिक, कवी
संपर्क- ८३९०५४१५५५

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *