नंदुरबार

तळोदा कृउबाच्या व्यापारी गाळेच्या भूमिपूजन व व्यापारी गाळे वितरण व लोकार्पण सभापती आमदार तथा राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते संपन्न..

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळेच्या भूमिपूजन सोहळा..

व्यापारी गाळे वितरण व लोकार्पण सभापती आमदार तथा राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते संपन्न..

तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:-

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन व नवीन बांधलेल्या व्यापारी गाळे वाटपचे लोकार्पण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

           तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन बांधलेल्या व्यापारी गाळेचा वाटप व लोकार्पण सोहळा सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

                    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन मंजूर झालेल्या नऊ व्यापारी गाळे बांधकामांचे भूमिपूजन कृउबास सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या हस्ते विधीवत पूजन करून करण्यात आले.

                      याप्रसंगी आमदार राजेश पाडवी, उपसभापती अमोल भारती, कृउबास संचालक रघुवीर चौधरी, प्रल्हाद फोके, जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, तालुका अध्यक्ष दरबारसिंग पाडवी, नारायण ठाकरे, श्याम राजपूत, माजी तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी,

गौतम जैन, कल्पेश माळी, प्रकाश माळी, विजय राणा, योगेश मराठे, सत्तारसिंग राजपूत, विठ्ठल बागले, विरसिंग पाडवी, जगदीश परदेशी, योगेश पाडवी, रोहिदास पाडवी, राजेंद्र गाढे, अंबालाल साठे, व सचिव सुभाष मराठे, प्रसाद बैकर, संजय कलाल, हेमंत चौधरी, अजय चव्हाण व धनराज मराठे कर्मचारी व्यापारी उपस्थित होते.

  • 1
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *