नंदुरबार

प्राप्त तक्रारीची तात्काळ दखल; विसरवाडी येथील कचरा डेपोची उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी

प्राप्त तक्रारीची तात्काळ दखल; विसरवाडी येथील कचरा डेपोची उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणी

 नंदुरबार | दि. : 07 सप्त नगरी न्यूज ब्युरो:-   प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या सूचनेनुसार श्री. कापसे, उपविभागीय अधिकारी, नंदुरबार विभाग यांनी आज नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची सविस्तर चौकशी केली.

यावेळी गट विकास अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. स्थानिक नागरिकांकडून कचरा डेपोबाबतच्या अडचणी व सूचना जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली.

पाहणीदरम्यान सद्यस्थितीचा आढावा घेऊन सदरील कचरा डेपो इतर योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा तसेच कचऱ्याची शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशा सूचना सरपंचांना देण्यात आल्या.

ग्रामस्थांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही प्राधान्याने करण्यात यावी, असे यावेळी निर्देश देण्यात आले.

नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सातत्याने कार्यरत असून लोकसहभागातून स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *