नंदुरबार

विठ्ठल नामाचा गजरात आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा वतीने विठ्ठल पूजन कार्यक्रम

  1.  विठ्ठल नामाचा गजरात आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा वतीने विठ्ठल पूजन कार्यक्रम

नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शहर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेले.आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री विठ्ठल माऊली पूजन सोहळ्यास भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीने लोकनेते स्व.बटेसिंगभैय्या रघुवंशी उद्यानाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या श्री पांडुरंगाच्या मूर्तीचे पूजन शिवसेना नेते तथा आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी,थिया राम रघुवंशी, शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वसावे,सोनिया राजपूत,प्रेम सोनार,भरत चौधरी,कीर्तनकार विधी पाटील,रोटरी क्लब देवेंद्र उपासनी,उपाध्यक्ष करणसिंग गिरासे,सुनील सोनार,चावरा स्कूलचे प्राचार्य फादर टेनी,सुशील गवळी,योगेश थोरात,मनोज गायकवाड,निलेश शाह यांच्यासह भाविक उपस्थित होते.

विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा केला.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *