नंदुरबार महाराष्ट्र

गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत २७ जुलै रोजी भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन

गौसन्मान आवाहन अभियान अंतर्गत २७ जुलै रोजी भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन

नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो:- गौमतेची सध्याची दुःखद परिस्थिती बघता भारतातील समस्त साधू संतांनी केंद्र सरकारने उपाययोजना कराव्या यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण देशात गौसन्मान आवाहन अभियान सुरु आहे. अभियानाचा पहिल्या टप्यात भारतातील पाच हजार तालुक्यात एप्रिल महिन्यात गौसन्मान रॅली काढून सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु तीन महिने उलटूनही अद्याप पावेतो सरकारने उपयोजना केली नाही.म्हणून अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय गौसन्मान रॅलीचे आयोजन भारतातील प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आले आहे.


नंदुरबार येथे दिनांक २७ जुलै सोमवार रोजी दुपारी ३:०० वाजता भूमी अभिलेख कार्यालय (सिटी सर्व्ह ऑफिस) जिल्हाधिकारी कार्यालय जवळ येथून ते जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे रॅलीचा समारोप होईल, त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती, प्रधानमंत्री, महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री यांना हजारो स्वाक्षरींचे निवेदन दिले जाईल. निवेदनात गौमाता राष्ट्र माता घोषित करणे, केंद्रीय गोसेवा आणि संरक्षण कायदा’ लागू करून देशातील सर्व कत्तलखान्यांचे परवाने रद्द करावे, स्वतंत्र केंद्रीय गौ मंत्रालय स्थापन करावे यासह अन्य मागण्यांसाठी भव्य गौसन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी समस्त गौभक्त गौप्रेमींनी हिंदु बंधू भगिनींनी या गौसन्मान रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गौसन्मान आवाहन अभियानाचा वतीने करण्यात आले आहे.

 

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *