नंदुरबार

भुरीवेल प्रकल्प १००टक्के भरला नदी काठच्या गावानां सतर्कतेचा इशारा

भुरीवेल प्रकल्प १००टक्के भरला नदी काठच्या गावानां सतर्कतेचा इशारा

नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, नंदुरबार या विभागांतर्गत असलेल्या लघु पाट बंधारे योजना. भुरीवेल, ता. नवापुर, जि. नंदुरबार या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यास्थितीत पाणी पातळी १०७.०० मी.ची नोंद झाली आहे. त्यामुळे सदर प्रकल्पात १००% क्षमतेने पाणी साठा झाला असुन सदर प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालु झाला आहे. तरी सुकी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
सुकी नदी काठावरील गावे भुरीवेल, थुवा, आमपाडा, गडद, खाटीजांबी व इतर गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये गुरढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जावू नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. असे आवाहन नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *