नंदुरबार

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे लवकरच कार्यान्वीत होणार;वीज जोडणीसाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरूधनंजय जाधव

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे लवकरच कार्यान्वीत होणार;
वीज जोडणीसाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरू
धनंजय जाधव

नंदुरबार, दिनांक 08 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्त) :
कोळदा-शहादा-खेतिया या राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 जी वरील पथदिव्यांचे काम पूर्ण झाले असून, वीज जोडणी करुन लवकरच हे दिवे कार्यान्वीत होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) शिबीर कार्यालय नाशिकचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

  • बाधित गावे: शहादा तालुक्यातील डामरखेडा, लांबोळा, मनरद, शहादा शहर, लोणखेडा, रायखेड, खेडदिगर आणि नंदुरबार तालुक्यातील लहान शहादा या गावांमधून जाणाऱ्या महामार्गावर हे पथदिवे बसवण्यात आले आहेत.
  • हायमस्ट लॅम्प: नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील रस्ते संगम तसेच प्रकाशा नदीवरील पुलाजवळ अशा एकूण 23 ठिकाणी हायमस्ट लॅम्प टॉवर उभारण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, नाशिक कार्यालयामार्फत महावितरणच्या संबंधित अभियंत्यांकडे वीज जोडणी मंजुरीसाठी अर्ज सादर केला असून या कामाचा कंत्राट घेतलेल्या एच.जी. इन्फ्रा अभियांत्रिकी लि. जयपूर या कंपनीला वीज जोडणीच्या कामाचा पाठपुरावा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एकदा का वीज जोडणी पूर्ण झाली की, त्यानंतर येणाऱ्या सर्व वीज देयकांचे (Electricity Bills) पेमेंट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, नाशिक यांच्याकडून केले जाणार आहे सर्व वीज जोडण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) शिबीर कार्यालय नाशिकचे कार्यकारी अभियंता श्री. जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *