
राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा ,येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक हे होते याप्रसंगी साक्षी बागुल हिने विज्ञान दिवसाच्या महत्त्व व सर सी.व्ही.रमण यांच्या कार्य या विषयावर भाषण केले. तर चौधरी वेदश्री हेमंत हिने विज्ञान व तंत्रज्ञानाचे फायदे स्पष्ट केले. डोईफोडे कोमल या विद्यार्थिनीने विज्ञान व तंत्रज्ञानाचे तोटे या विषयावर आपले मत व्यक्त केले. कापुरे गौरवी मुकेश या विद्यार्थिनीने अंधश्रद्धा व भुरसट कल्पना या विज्ञानाने कसे खोडून काढले आहेत याविषयी सविस्तर माहिती सांगितली. ठाकरे अश्विनी व राजपुरोहित देवी या विद्यार्थिनींनी भारतीय व विदेशी शास्त्रज्ञ व शोध त्यांच्याबद्दल माहिती सांगितली.
याप्रसंगी इंटर हाऊस क्विझ कॉम्पिटिशन घेण्यात आले ज्यात हॅलो हाऊस हा विजेता ठरला. विजेत्या हाऊसचे मुख्याध्यापक श्री .नाईक सरांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
अध्यक्षीय भाषणात नाईक म्हणाले की आपण सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापर हा समस्त मानव जाती च्या कल्याणासाठी होईल असे वागावे. आज जगात सर्वत्र जी अराजकता किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे व ऑटोमिक पॉवर देश हे ऑटोमिक पॉवरच्या धमक्या देऊन मानव जातीला हानी होईल असे वागताना दिसत आहेत.असं न करता त्या ऑटोमिक पॉवरच्या उपयोग वीज निर्मिती तसेच मानव कल्याण साठी करावा अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक राजेंद्र पाडवी यांनी केले तर आभार प्रदर्शन मीत देसाई यांनी मांडले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





