नंदुरबार

नवीन रिक्षा, टॅक्सी परवान्यांच्या ‘खुले धोरणा’ला स्थगिती; उत्तम जाधव

नवीन रिक्षा, टॅक्सी परवान्यांच्या ‘खुले धोरणा’ला स्थगिती;
उत्तम जाधव

नंदुरबार, दिनांक 12 मार्च,  (जिमाका वृत्त) :
नवीन ऑटो रिक्षा-टॅक्सी परवान्यांच्या सध्याच्या ‘खुले धोरणा’ला तात्काळ प्रभावाने स्थगिती देण्यात आली असून, नवीन इरादापत्रे देण्याचे काम थांबवण्यात आले आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

राज्यातील विविध संघटनांकडून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांचे खुले धोरण बंद करण्याबाबत विनंती परिवहन आयुक्त कार्यालयास प्राप्त झाली होती. त्यानुसार परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 09 मार्च 2026 रोजी बैठक पार पडली असून या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, परिवहन मंत्र्यांनी रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणास स्थगिती देण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *