
अन्न व औषध प्रशासन कार्यालय आता नवीन जागेत;
संतोष कांबळे
नंदुरबार, दिनांक 12 मार्च, (जिमाका वृत्त) :
अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार येथील सहायक आयुक्त कार्यालयाचा पत्ता बदलला असून, 1 मार्च, 2026 पासून हे कार्यालय आता नवीन जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. सर्व कारभार नवीन वास्तू मधून सुरू झाला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन, सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यापूर्वी हे कार्यालय महाराणा प्रताप चौक येथील आदिवासी दूध उत्पादक सहकारी संघ मर्यादितच्या इमारतीत कार्यरत होते. प्रशासकीय सोयीसाठी आता हे कार्यालय साक्री रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या आवारात हलवण्यात आले असून कार्यालयाचा नवीन पत्ता ‘सहायक आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, मालमत्ता क्र. 1063, सर्वे नं. 414, शासकीय दूध डेअरी आवार, आर.टी.ओ. कार्यालयाजवळ, साक्री रोड, नंदुरबार -424412’ असा आहे.
नागरिकांनी तसेच संबंधित व्यावसायिकांनी कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष संपर्कासाठी वरील नवीन पत्त्याचा वापर करावा. तसेच कोणत्याही चौकशीसाठी 02564-299053 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा fda.nandurbar२०@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा असेही अन्न व औषध प्रशासन, सहायक आयुक्त श्री. कांबळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
- 0
- 0
- 0
- 0





