नंदुरबार

एकदिवसीय स्काऊट गाईड शिबिर शेजवा शाळेत संपन्न

एकदिवसीय स्काऊट गाईड शिबिर शेजवा शाळेत संपन्न

नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत एकदिवसीय स्काऊट गाईड शिबिर निसर्ग रम्य परिसरात संपन्न झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते तर शिबिराचे उद्घाटक पिंपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेजवा गावाचे उपसरपंच मुन्ना वसावे, पोलीस पाटील योगेश वसावे माजी उपसरपंच विजयसिंह वसावे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते लॉर्ड बॅटन पावेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष भाषणातून मुख्याध्यापक पाटील यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना स्काऊट गाईड शिक्षणातून शिस्त स्वालंबन तत्परता, नेतृत्व गुण, कलागुणांना वाव मिळते ,बंधुभाव निर्माण होतो अशा विविध विषयांवर माहिती दिली तर उद्घाटक हिरामण वाघ यांनी तीन बोटांचा सॅल्यूट तसेच आपल्या जीवनात स्काऊट गाईडच्या माध्यमातून समाजसेवेची आवड निर्माण होते याविषयी सविस्तर माहिती दिली तर उपशिक्षक विजय पवार यांनी स्काऊट गाईड मध्ये डाव्या हाताने हस्तांदोलन का केले जाते ,आपल्या जीवनात शिस्त कशी लागते हे संपूर्ण आपल्याला शिबिराच्या माध्यमातून समजत असते याविषयी सविस्तर माहिती दिली.

शिबिर अंतर्गत विद्यार्थ्यांनी श्रमदान करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला होता तसेच तंबू सजावट व स्वयंपाक तयार केला होता या सर्वांचे परीक्षण अध्यक्ष ,उद्घाटक व मान्यवरांनी केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा . सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्काऊट शिक्षक संजय बोरसे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाईड शिक्षिका श्रीमती संगीता गोखले यांनी केले तर आभार कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी मानले सदरील कार्यक्रमाला शाळेचे उपशिक्षक दीपक वळवी, रामानंद बागले, हरून खा शिकलीगर, संदीप गायकवाड ,लिपिक नेहा शर्मा यादी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांचे स्काऊट गाईडच्या शिबिरामध्ये प्रथम उपचारावर आधारित विविध प्रात्यक्षिकी करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध गीत सादर करण्यात आली. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेची शिपाई संजय वसावे दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *