नंदुरबार

तळवे ग्रामपंचायत च्यावतीने सामाजिक कार्याचा यथोचित गौरव; उमेश सोनवणे यांच्या ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित.

तळवे ग्रामपंचायतीचा उपक्रम; सामाजिक कार्याचा यथोचित गौरव; उमेश सोनवणे यांच्या ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित.

तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो
तळोदा तालुक्यातील  तळवे ग्रामपंचायतीच्या वतीने ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ‘सेवाभावे प्रतिष्ठान’चे अध्यक्ष उमेश विजय सोनवणे यांना ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार तळवे गावचे लोकनियुक्त सरपंच मोग्या  भिल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

                     प्रजासत्ताक दिनानिमित्त तळवे गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजवंदन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या मुख्य कार्यक्रमात, गेल्या अनेक वर्षांपासून ‘सेवाभावे प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गावात विविध लोकोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या आणि निस्वार्थ भावाने समाजसेवा करणाऱ्या उमेश सोनवणे यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. व त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ‘सेवाभावे प्रतिष्ठान’ने आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. संस्थेचे कार्य केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित नसून, विविध ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबवले जातात. शिक्षण, आरोग्य, आणि कृषी क्षेत्रातील अडीअडचणी सोडवण्यासाठी संस्था नेहमीच पुढाकार घेते. कुठलीही सामाजिक गरज असो, तिथे मदतीसाठी धावून जाणे आणि चांगल्या कामात सातत्य राखणे हे त्यांच्या संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवेची दखल घेत ग्रामपंचायतीने त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड केली.
               पुरस्कार सन्मानित सत्काराला उत्तर देताना उमेश सोनवणे म्हणाले की, “हा पुरस्कार संस्थेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. गावाने टाकलेल्या या विश्वासामुळे काम करण्यास अधिक बळ मिळाले आहे.”
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेश सोनवणे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

  • 0
  • 1
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *