पुणे

लेखिका शुभदा गोगटे यांचे दुःखद निधन

लेखिका शुभदा गोगटे यांचे दुःखद निधन

नामवंत मराठी लेखिका शुभदा गोगटे यांचं आज पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. विज्ञान काल्पनिकेपासून लिखाणाला सुरुवात केल्यानंतर यंत्रायणी या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला 1983 यावर्षी महाराष्ट्र सरकारचा साहित्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या अनेक विज्ञान आणि गूढ कथा प्रकाशित झाल्या आहेत.

साहित्य अकादमी आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास यांनी प्रकाशित केलेल्या भारतीय वैज्ञानिक कथांच्या प्रातिनिधिक संग्रहांत त्यांच्या विज्ञान कथांचा समावेश आहे. शुभदा गोगटे यांच्या भारतातील रेल्वे इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ आणि ‘सांधा बदलताना’ या दोन कादंबऱ्या बऱ्याच गाजल्या.

‘खंडाळ्याच्या घाटासाठी’ या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह. ना. आपटे पुरस्कार तसंच मृण्मयी पुरस्कार मिळाला होता. याशिवाय त्यांचं डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्या ‘रिव्हरसिंग द हार्ट डिसीज’ या कार्यक्रमावर आधारित ‘हृदयविकार निवारण’ हे उपयुक्त पुस्तक अतिशय लोकप्रिय झालं.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *