आरोग्य नंदुरबार

शहादा तालुक्यात ४४हजार ७४८ बालकांना पल्स पोलिओ लसीकरण नगरसेविका ममता हेमराज पवार यांच्या हस्ते शुभारंभ

शहादा तालुक्यात ४४हजार ७४८ बालकांना पल्स पोलिओ लसीकरण नगरसेविका ममता हेमराज पवार यांच्या हस्ते शुभारंभ

सप्त नगरी न्यूज ब्युरो:-

शहादा.दिं.२८ तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत शहादा शहर व ग्रामीण भागातील ९३ हजार २७१ घरातील पाच वर्षे आतील ४४हजार ७४८ बालकांना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम विविध केंद्रांवर राबविण्यात आली.सकाळपासून अनेक केंद्रांवर विविध आशा वर्कर रुग्णालयातील महिला कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी पल्स पोलिओ मोहिमेच्या शुभारंभ केला. शहादे शहरातील लोणखेडा बायपास रस्त्यालगत असलेल्या गोकर्णेश्वर महादेव मंदिरच्या आवारात शहादा नगरपालिका नगरसेविका ममता हेमराज पवार यांच्या हस्ते बालकाला डोस पाजून पल्स पोलिओ लसीकरण शुभारंभ करण्यात आलेला आहे.


दोन दिवस अगोदर पल्स पोलिओ मोहीम बाबत शहादा ग्रामीण रुग्णालयातर्फे तसेच नगरपालिका प्रशासनातर्फे ० ते ०५ वयोगटातील मुलांसाठी जनजागृती करण्यात आली होती.जास्तीत जास्त मुलांना पोलिओ डोस देण्याबाबत प्रयत्न करण्यात आला.शहादा शहर व ग्रामीण भागात एकूण ४४ हजार ७४८ वय वर्ष पाच आतील बालक आहेत. शहर व ग्रामीण भागात लसीकरण दोष पाडण्यासाठी ३१६ टीम तयार करण्यात आलेले आहेत यात ८१४ कर्मचारी व ६५ सुपरवायझर आहेत. शहरांमध्ये एकूण २७ केंद्रांवर रविवारी पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आलेले आहे
एकूण २७ पोलिओ डोस लसीकरण केंद्र होते.नगरपालिका प्रत्येक अर्थात चौदा प्रभागांमध्ये केंद्र करण्यात आलेले.होते

.सकाळपासूनच पालकांनी मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयामार्फत आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या.
शहादा शहरातील गोकर्णेश्वर महादेव मंदिर परिसरात पोलिओ डोस लसीकरण केंद्रात शहजादा विधानसभा आमदार राजेश पाडवी यांनी पल्भेस पोलिस लसीकरण केंद्र ठिकाणी भेट दिली आहे. नगरसेविका ममता पवार व आमदार राजेश पाडवी यांचे स्वीय सहाय्यक हेमराज पवार यांच्या हस्ते बालकाला डोस पाजवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रवासी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर पाटील उपस्थित होते.शहरात सर्वाधिक बालकांची गर्दी गोकर्णेश्वर महादेव मंदिर परिसरात झालेली होती.


या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक १४ मध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील यांच्या निवासस्थानी पोलिओ लसीकरण केंद्र होते.नगरसेविका सरिताताई पाटील यांच्या हस्ते बालकाला पोलिओ डोस पाजण्यात आला.गणेश पाटील यांनी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केलेल्या होत्या.स्वतः मोहीम संपेपर्यंत लक्ष ठेवून होते.एकंदरीत पोलिओ डोस लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी देखील लसीकरण केंद्रांना भेट देऊन समाधान व्यक्त केले.
पल्स पोलिओ लसीकरण मोही म शहादा तालुका व शहरात राबविण्यात येत आहे शहादे शहर व तालुक्यात एकूण ४४ हजार ७४८ वय वर्ष ५ आतील बालकांना डोस पाजण्यात येणार आहे रविवारी (दिलं.२८) दिवसभरामध्ये जेवढे बालकांना डोस पाजले जातील उर्वरित बालकांना डोस पाजण्यासाठी येत्या सोमवार ते बुधवार पर्यंत तीन दिवस घरपोच अभियान राबवण्यात येणार आहे शहादा शहर व तालुक्यात एकूण ९३ हजार २७१ घर असून प्रत्येक घरोघरी अशा वर्कर,अंगणवाडी सेविका ,ग्रामीण भागातील रुग्णालयातील महिला कर्मचारी हे बालकांना डोस पाजवणार आहेत .
.शहादा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *