
विविध कामाचे उद्घाटन खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते संपन्न
नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो
बर्डीपाडा गावाला भेट देऊन नव्याने उभारण्यात आलेल्या बीएसएनएल मोबाईल टॉवरचे उद्घाटन केले. तसेच जिल्हा परिषद शाळेत बसविण्यात आलेल्या सीसी टीव्ही यंत्रणेचे उद्घाटन खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या वर्गखोल्यांची पाहणी केली.

या वेळी सरपंच तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेषतः जल जीवन मिशनच्या अडचणी तसेच वीजवितरण कंपनीच्या संबंधित प्रश्न, विशेषतः या भागात होत असलेले वारंवार लोडशेडिंग आणि अखंडित वीज पुरवठ्यासाठी ३३ केव्ही फीडरची गरज याबाबत सविस्तर चर्चा केली. संबंधित विभागांकडे आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. असे खासदार गोवाल पाडवी यांनी सांगितले.
Bardipada #Sakri #BSNL #ZPSchool #JalJeevanMission MSEB 33KVFeeder RuralDevelopment Nandurbar
- 0
- 0
- 0
- 0





