शहर व गावांना जेडणारे रस्ते, पूल हे विकासाचे मुख्य स्रोत आहे.अशा कामांना प्राधान्यक्रम राहील – आमदार राजेश पाडवी
गोमाई नदी वरील पूल व भेंड्या नाल्यावरील फरशी पूलचे लोकार्पण संपन्न

शहादा . दि. १९ | सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
रस्ता ही दळणवळणाचे मुख्य साधने आहेत गावागावांना शहराला जोडणारा फुल, ग्रामीण भागात असलेल्या नाल्यांवरती फरश्या हा विकासाच्या मुख्य स्त्रोत असुन तालुक्यातील तीखोरा गावालगत असलेल्या गोमाई नदीवरील २०० मीटरच्या सुमारे २० कोटी रुपये खर्चाचा पुल तसेच मामाच्या मोहिद्या गावाला लागत भेंड्या नाल्यावरील फरशी यांच्या काम पूर्ण झालं असून या दोघं पुलामुळे दळणवळणाच्या साधना सोबत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गेल्या दीड दोन वर्षापासून झालेले गैरसोय दूर होणार आहे, यासोबत तालुक्यातील नदी नाल्यावरील पूलाचे बांधकाम साठी प्राधान्य देण्यात येईल रोड रस्त्यांच्या विकासासोबत शेतकरी, विद्यार्थ्यांच्या देखील विकासाच्या दृष्टीने काम करणार असल्याचे प्रतिपादन शहादा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांनी पुलांचं लोकार्पण सोहळा प्रसंगी व्यक्त केलेला आहे.

शहादा शहरातून गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या तसेच गोमाई नदीच्या परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या तिखोरा येथील गोमाई नदीवरील मोठ्या पुलाचे तसेच मामाचे मोहिमा गावालगत भेंड्वा नाल्यावरील पुलाचे कामांचे
लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते झाले.

गेल्या दोन वर्षांपासून या पुलाचे काम सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता हा पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याचबरोबर मोहिदा गावाजवळील शहादा-सोनवद मुख्य रस्ता तिखोरा येथील गोमाई नदीवरील पूल हा केवळ एका गावापुरता मर्यादित नसून, परिसरातील अनेक गावांना शहादा शहराशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून गुजरात आणि मध्य प्रदेशातून येणारी-जाणारी वाहनेही मोठ्या प्रमाणावर मार्गक्रमण करतात. त्यामुळे पुलाचे काम सुरू असताना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. यामुळे प्रवासाचे अंतर, वेळ आणि वाहतुकीचा खर्च वाढत होता. विशेषतः दररोज शिक्षणासाठी शहादा शहरात येणारे विद्यार्थी, शेतीच्या कामासाठी ये-जा करणारे शेतकरी आणि विविध कामांसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना या अडचणींचा सामना करावा लागत होता.
पूल बंद असल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे इंधनाचा अतिरिक्त खर्च, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. या पुलाचे काम पूर्ण होऊन लोकार्पण होत असल्याने दळणवळण अधिक सुलभ होण्याबरोबरच परिसरातील गावांचा शहादा शहराशी असलेला संपर्क अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

मोहिदा-सोनवद मार्गावरील पुलामुळेही अडचणी दूर होणार
शहादा-सोनवद मुख्य रस्त्यावर मोहिदा गावाजवळील पुलाचेही नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. या पुलाचे लोकार्पणही झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी तसेच विद्यार्थ्यांना पूल महत्त्वाचा ठरणार असून, सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पुलांमुळे परिसरातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल. तालुक्यातील तीखोरा गावालगत गोमाई नदीवरील २०० मीटर लांबीच्या सुमारे २० कोटी रुपये खर्च मंजुरीच्या व २६ महिन्याच्या मुदतीत पुलाचे बांधकाम असतांनाच ठेकेदार के.के.पाटील यांनी चार महिने अगोदर मुदतीत पूर्ण काम करुन पुलाचा लोकार्पण सोहळा आमदार यांचे हस्ते करण्यात आला आहे.

तिखोरा येथील गोमाई नदीवरील पुलाच्या लोकार्पण सोहळ्यास शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. प्रमुख उपस्थितांमध्ये भाजपचे प्रदेश सदस्य दीपक पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील,
नंदुरबार जिल्हा परिषद माजी सभापती श्रीमती कंचन पाटील, शहादा नगरपालिकेचे बांधकाम सभापती संतोष वाल्हे नगरसेवक सुनील पाटील ,ललित छाजेड ,कल्पेश पटेल ,हरीश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोतीलाल जैन, श्री महावीर नागरी सागर पतसंस्थेचे संचालक राजाराम पाटील, भाऊ भाई पाटील,आ. सचिव हेमराज पवार,विनोद जैन, गणेश पाटील,श्रीराम पाटील,तुषार पाटील, कुंदन पाटील ,सुभाष वाघ ,काशिनाथ सोनार ,भरत कोळी, सनी जाधव, किरण सोनवणे ,आत्माराम पाडवी ,अजब सिंग गिरासे, प्रशांत कुलकर्णी, एकनाथ नाईक,लोणखेडा भाजप मंडळ अध्यक्ष नितीन पाटील, म्हसावद भाजप मंडळ अध्यक्ष विश्वास ठाकरे, तिखोरा ग्रामपंचायतीचे सरपंच परशुराम बापू सोनवणे तसेच शहादा येथील कंत्राटदार के. के. पटेल,पुलांच्या बांधकामाशी संबंधित कामकाजात कार्यकारी अभियंता शैलेंद्र शिंदे, उपकार्यकारी अभियंता सचिन पगारे, कनिष्ठ अभियंता रोहित पटेल, उपअभियंता भाग्यश्री चौधरी आणि सहाय्यक अभियंता जीवन काटेकर उपस्थित होते.

रस्ते आणि पूल हे ग्रामीण भागाच्या विकासातील महत्त्वाचे घटक आहेत. शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालयांपर्यंतची ये-जा, आरोग्यसेवा आणि बाजारपेठांशी संपर्क यासाठी सुस्थितीतील रस्ते व पूल आवश्यक असतात. तिखोरा आणि मोहिदा परिसरातील या दोन पुलांमुळे वाहतुकीतील अडथळे दूर होऊन नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होईल. तसेच शहादा शहरासह गुजरात आणि मध्य प्रदेशाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही हा मार्ग अधिक सोयीचा ठरण्याची अपेक्षा आहे.
आमदार राजेश पाडवी शहादा- तळोदा विधानसभा मतदार संघ
- 0
- 0
- 0
- 0





