
तळोदा येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात जागतिक पर्यावरण दिन साजरा
तळोदा / सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
तळोदा येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक हे होते. यावेळी शाळेतील हरित सेना समितीच्या प्रमुख देवदान वळवी व श्रीमती मनिषा मगरे यांच्या उपस्थितीत वेदश्री हेमंत चौधरी, साक्षी अविनाश बागुल व कोमल अशोक डोईफोडे या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगता द्वारे पर्यावरण व मानवी जीवन यांच्या सहसंबंध बाबत आपले विचार व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून विकास वाडिले यांनी पर्यावरण रक्षणाचे उपाय योजना या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनात आपण जर आज पर्यावरण संरक्षण केले नाही तर आपले येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही, एक पेड माँ के नाम या शासनाचा योजना फक्त एक दिवस पुरता न साजरा करता जमेल तेव्हा प्रत्येकाने एक रोप लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले. प्रगतीच्या नावाने जर एखादे झाड तोडावेच लागले तर आधी 10 रोप लावा व ते वाढवा, प्लास्टिक वापर बंद करा असे आवाहन सत्यजित नाईक यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन विशाल पाडवी सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
- 1
- 0
- 0
- 0





