नंदुरबार

नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिरात पर्यावरण दिन उत्साहात साजरा – Sapta Nagari News

नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिरात पर्यावरण दिन उत्साहात साजरा

तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिर तळोदा येथे वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज तसेच नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य सुनील परदेशी व मुख्याध्यापिका भावना डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरुकिया , संचालिका सोनाबेन तुरुखिया**, उपाध्यक्ष दगेसिंग महाले, सचिव संजयभाई पटेल तसेच संस्था समन्वयक हर्षलभाई तुरुखिया यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *