नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात वीर बाल दिवस साजरा

तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो
मातृभूमी आणि धर्माच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुति देणार्‍या गुरू गोविंदसिंगजी यांच्या चार वीर पुत्रांच्या अद्वितीय त्यागाचे स्मरण म्हणून तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यात आला.

                लहान साहिबजादे जोरावर सिंह जी, फतेह सिंह जी यांच्या बलिदानाला समर्पित या दिवसा प्रसंगी गुरूजींच्या महान वीर पुत्रांना आदरांजली वाहण्यात आली.
                         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.डाॅ.जयपालसिंह शिंदे यांनी भूषविले. प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित प्रा.डॉ.आर. एल.राजानी यांनी यावेळी वीर बाल दिवसाचे महत्त्व स्पष्ट करत परम श्रद्धेय गुरु गोविंद सिंह व त्यांच्या चार पुत्रांच्या त्याग आणि बलिदानाची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली.
डाॅ.शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करून आणि ‘साधे जीवन, उच्च विचार’ चा अवलंब करून कशा पद्धतीने आपण आपले जीवन सार्थकी लावू शकतो, याबाबत विचार मांडले. यावेळी त्यांनी सदर दिवस हा भारताचे थोर अर्थशास्त्रज्ञ व माजी पंतप्रधान स्व.डॉ.मनमोहन सिंग यांचा स्मृति दिवस आणि थोर समाज सुधारक बाबा आमटे यांची जयंती असल्याचेही सांगितले. प्राचार्य डॉ. हेमंत दलाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.स्वप्निल वाणी यांनी केले. प्रा.डॉ.आर. झेड.यशोद, प्रा.डॉ.प्रसाद भोगे यांचे सहकार्य लाभले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *