
नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो
नंदुरबार विभागीय वनरक्षक–वनपाल संघटनेच्या वतीने वनरक्षक व वनपाल यांच्या विविध प्रलंबित अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी नंदुरबार वनविभाग उपवनसंरक्षक संतोष सस्ते, भा.व.से., तसेच सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.

या प्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संतोष सस्ते व डॉ. मकरंद गुजर यांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल व संघटनेचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर वनरक्षक– वनपाल व इतर वन कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणींबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. माननीय साहेबांनी सर्व मुद्द्यांवर सहकार्याची भूमिका घेत संबंधित प्रश्न विषयी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत वन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता फरका सह अदा करणे, सर्व्हिस बुक ऑनलाइन अद्ययावत करणे, जेष्ठता यादी दुरुस्ती, बदली प्रक्रिया पारदर्शक करणे, पदोन्नती प्रक्रिया गतीमान करणे, वेतन व भत्ते वेळेत अदा करणे, गणवेश भत्ता, कायदेशीर संरक्षण, मानव–वन्यजीव संघर्ष व पीक नुकसान प्रकरणे तातडीने निकाली काढणे, गस्ती साहित्याचा नियमित पुरवठा तसेच प्रलंबित विभागीय चौकशी पूर्ण करणे आदी एकूण २० महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या.
या भेटीच्या वेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष अरविंद निकम, राज्यस्तरीय सहसचिव दीपक जमदाडे, महिला उपाध्यक्ष श्रीमती सोनल बोरसे, सचिव भरत परदेशी, उपाध्यक्ष कल्पेश अहिरे, खजिनदार भानुदास वाघ, सह–खजिनदार भूपेश तांबोळी, वृत्तीय संघटक युवराज भाबड तसेच संघटक देवमन सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
- 1
- 0
- 0
- 0





