नंदुरबार नाशिक

मोडचे पुरुषोत्तम चव्हाण यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार जाहीर; नाशिक येथे दि. 26 रोजी पुरस्कार वितरण सोहळा..

मोडचे पुरुषोत्तम चव्हाण यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार जाहीर..

नाशिक येथे दि. 26 रोजी पुरस्कार वितरण सोहळा ..

तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तालुक्यातील मोड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतिशील शेतकरी पुरुषोत्तम चव्हाण यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नाशिक येथील जाणीव सांस्कृतिक अभियान यांच्यातर्फे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय उद्योजक प्रशासकीय व कृषी आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक कृतज्ञता म्हणून राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान करीत गौरविण्यात येते.

नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा दि. 26 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता आयोजित केला आहे. पुरस्कार वितरण माँसाहेब जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज, शिवाजी द. राजेजाधव सिंदखेड राजा, मा. विशेष पोलीस महानिरिक्षक, नाशिक परिक्षेत्र तथा महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ संविधानिक सदस्य, डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आकाश जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोषआप्पा मराठे बोईसर, शाहिद सार्जंट मिलिंद खैरनार यांच्या वीर पत्नी हर्षदा खैरनार यांच्या उपस्थित राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते तथा प्रगतिशील शेतकरी पुरुषोत्तम चव्हाण यांना राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जाणीव संस्थांचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ पाटील व पदाधिकारी सदस्य यांनी माहिती दिली आहे.

  • 0
  • 1
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *