नंदुरबार

तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील कॅडेट्सची विद्यापीठ स्तरीय आविष्कार स्पर्धेत निवड

तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील कॅडेट्सची विद्यापीठ स्तरीय आविष्कार स्पर्धेत निवड

तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो

तळोदा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एककातील चार छात्र सैनिकांनी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार 2025 स्पर्धेत पाटील पूनमबेन संजयभाई, वळवी, सोनाली कुवरसिंग या विद्यार्थीनीनी “ए आय- बेस्ड वाइल्डलाईफ कॉन्सरवशन अँड प्रिवेंशन सिस्टीम फॉर द ह्यूमन अनिमल कॉन्फिकॅक्ट इन अग्रीकल्चर अँड रूरल एरिया ऑफ महाराष्ट्र” या विषयावर पोस्टर सादर केले होते. तर वसावे पार्वती भिमसिंग, वळवी वर्षा शेमट्या या दोघी विद्यार्थिनी “अ सिस्टमटीक स्टडी ऑफ हर्बल ट्रीटमेंट फॉर लम्पि स्किन डिसीस इन कॅटल” या पोस्टर सादर केले होते. याच पोस्टर्स चे सादरीकरण करणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनींची नंदुरबार जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विद्यापीठ स्तरीय आविष्कार स्पर्धेत निवड झाली आहे. दिनांक 30 आणि 31 डिसेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे सादर केले जाणार आहे. आविष्कार स्पर्धेत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना छात्रसैनिकांचा महाविद्यालयात गौरवपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. सत्कार समारंभात अध्यापक शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे उपाध्यक्ष रोहितभाऊ माळी. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सचिव डॉ. एच. एस. दलाल यांच्या हस्ते निवड झालेल्या छात्रसैनिकांना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयासाठी व राष्ट्रीय छात्र सेना एककासाठी ही बाब अत्यंत अभिमानाची गौरवास्पद असून, छात्रसैनिकांना मार्गदर्शन करणारे लेफ्टनंट डॉ. राजू झावराव यशोद यांचे अभिनंदन करण्यात आले. समनव्यक डॉ. गौतम मोरे याचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.एच. एस. दलाल यांनी निवड झालेल्या छात्रसैनिकांना विद्यापीठ स्तरीय आविष्कार स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मनः पूर्वक शुभेच्छा दिल्यात तसेच उपस्थित छात्रसैनिकांनी या यशातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेना विभाग, 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेरचे समादेशक अधिकारी कर्नल अमित रे तसेच प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पिनाकी बनिक यांनी देखील यशस्वी झालेल्या छात्रसैनिकांचे अभिनंदन करत बटालियनचे नावलौकिक केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली वळवी आणि आभार पार्वती वसावे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र विभागातील कॅडेट्स उपस्थित होते.

  • 0
  • 1
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *