जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडून तोरणमाळ येथील विकास कामांची पाहणी!

नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भा.प्र.से.) यांनी दिनांक २९ जुलै रोजी तोरणमाळ येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. या दौऱ्या दरम्यान त्यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा आढावा घेत यंत्रणेला आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल यांनी तोरणमाळ अंतर्गत येणाऱ्या बुरुमपाडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या अंगणवाडी बांधकामाची पाहणी केली. बालकांच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी ही वास्तू दर्जेदार व्हावी, यासाठी त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत सूचना केल्या.

याशिवाय, तोरणमाळ येथील यशवंत तलावाजवळ सुरू असलेल्या जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) कार्यक्रमांतर्गत विहिरीच्या कामाची देखील त्यांनी पाहणी केली.

प्रशासकीय नियंत्रण अधिक प्रभावी होणार.
या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी ग्रामस्थ तसेच संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या आढाव्यामुळे विकास कामांवरील प्रशासकीय नियंत्रण अधिक प्रभावी होणार असुन यातून विकास कामाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यास नक्कीच मोठी मदत होणार आहे.
- 0
- 0
- 0
- 0





