नंदुरबार

तळोदा शेठ के डी हायस्कूल भारतीय प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा.

शेठ के डी हायस्कूल तळोदा येथे  भारतीय प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा.


तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो

तळोदा येथील पी. इ सोसायटी सोसायटी संचलित शेठ के. डी. हायस्कूलात भारतीय प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण पी.ई.सोसायटी अध्यक्ष लक्ष्मण माळी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी पी.ई.सोसायटी संचालक कॉलेज ट्रस्ट अध्यक्ष भरत बबनराव माळी, गणेश सोशल ग्रुप अध्यक्ष संजय बबनराव माळी, विश्वनाथ  कलाल, संचालक जितेंद्र लक्ष्मण सुर्यवंशी, तसेच गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, शिक्षणविस्तार आधिकारी सौ.आरती शिंपी, पोलिस निरीक्षक राजन मोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

             संविधान वाचन करण्यात आले. तसेच कॉपीमुक्त शपथ,असाक्षर मुक्त गावाची शपथ घेण्यात आली. तसेच ईच्छापुर्ती निमित्त विविध स्पर्धेतील विजेते तसेच एन.सी.सी.कँम्पचे विद्यार्थी ,यशस्वी विद्यार्थी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीत पथकाने सादर केले.एन.सी.सी.संचलन, देशभक्तीपर कवायत तसेच देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये आनंद,जोश उत्साह होता.विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापकतसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.

  • 0
  • 1
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *