नंदुरबार महाराष्ट्र

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिनाताई गावित डेडीयापाडा येथे विश्वस्तांशी केली चर्चा; आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवीच्या चरणी केली प्रार्थना

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिनाताई गावित

डेडीयापाडा येथे विश्वस्तांशी केली चर्चा; आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवीच्या चरणी केली प्रार्थना
                    आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या याहा मोगी देवी अर्थात देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासकामांसमोरील वन खात्याच्या कायद्यांचा अडसर दूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. यासाठी नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल, अशी ठाम ग्वाही भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार तथा ‘संसद रत्न’ डॉ. हिनाताई गावित यांनी दिली.

गुजरात राज्यातील डेडीयापाडा येथे वसलेल्या देव मोगरा माता मंदिराच्या विश्वस्तांसोबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची योग्य सोय व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र भवन उभारणीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र वनविभागाच्या जमिनीशी संबंधित कायदेशीर अडचणींमुळे या कामाला विलंब होत असल्याची बाब यावेळी चर्चेत आली.

            या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी आणि सर्व अडसर दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन डॉ. हिनाताई गावित यांनी दिले. तसेच मंदिर विश्वस्तांशी संवाद साधत त्यांनी मंदिर परिसरातील सुविधा, भाविकांची वाढती संख्या आणि विकासकामांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीसाठी देवीला घातले साकडे

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार, माजी आदिवासी विकास मंत्री तसेच भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ. हिनाताई गावित यांनी देव मोगरा माता मंदिरात जाऊन देवीचरणी प्रार्थना केली. पारंपरिक विधीनुसार पूजन करून त्यांनी आदिवासी समाजाच्या कुलदैवताप्रती मनोभावे श्रद्धा व्यक्त केली. या प्रसंगी देव मोगरा माता मंदिराचे उपाध्यक्ष श्री. कांतीभाई कोठारी, गुरुजी श्री. दिलीपभाई वासावा, सचिव श्री. नानसिंगभाई वसावा, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश दादा पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष नितेश पाडवी, अमृतभाऊ चौधरी तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *