नंदुरबार

रांझणी आश्रमशाळेत तीन दिवसीय ”कर्मण्य महोत्सव”श्री.साईनाथ शिक्षण संस्थेचा उपक्रम.

रांझणी आश्रमशाळेत तीन दिवसीय ”कर्मण्य महोत्सव”
श्री.साईनाथ शिक्षण संस्थेचा उपक्रम


तळोदा : येथील श्री.साईनाथ शिक्षण संस्थेच्या विद्यावर्धिनी निवासी प्राथमिक आश्रम शाळेत तीन दिवसीय कर्मण्य महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या तीन दिवसांमध्ये कला,क्रीडा,संस्कृती,साहित्य सांस्कृतिक कलाविष्कार अशा विविध गुणांचे दर्शन विद्यार्थ्यांमार्फत घडणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये असा नाविन्यपूर्ण उपक्रम पहिल्यांदाच पार पडत आहे.
नाशिक आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन शनिवार १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, प्रकल्प अधिकारी अनय नावंदर,भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी,आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळा देखिल संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात विविध क्रिडा स्पर्धा पार पडतील.माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांचे संस्कार, संस्कृती प्रबोधन पर व्याख्यानाचे आयोजन सायंकाळी करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी १८ जानेवारी रोजी कोठार,रांझणी,प्रतापपूर गावासाठी व शाळांसाठी सीएसआर फंड मधून मिळालेल्या २९ सोलर हायमस्ट लाईट व रुग्णवाहिकेचे श्री. साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ शशिकांत वाणी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला एसजेव्हीएनचे जनरल मॅनेजर विक्रम मौदगिल,डेफ्टी मॅनेजर नायाब अहमद, नागेश पाडवी शैलेश कुमार विजयकुमार जैन, अभय सोनटक्के आदी उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात शाळेत विद्यार्थ्यांच्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे संध्याकाळी विद्यार्थी चे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील.
१९ जानेवारी रोजी प्रा. माधव कदम यांच्या श्यामची आई या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर लाडशाखीय वाणी समाजाचे राज्याध्यक्ष राजेश कोठावदे यांच्या अध्यक्षतेखाली
तीन दिवसीय महोत्सवात क्रीडा, सांस्कृतिक, चित्रकला, रांगोळी स्पर्धा, विजेत्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस निरीक्षक राजन मोरे,नगरसेवक शिरीष माळी,रवींद्र मोराणकर, प्रशांत कोतकर, दगडू शिरुडे,प्रकाश शिरुडे, आदींची उपस्थिती राहणार आहे.
संस्थेच्या दोन्ही आश्रमशाळांचे विद्यार्थ्यांच्या एकत्रितरित्या हा महोत्सव पार पडणार आहे. श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ संस्थेचे संचालक मंडळ व कोठार व रांझणी येथील आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.

  • 1
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *