शहादा येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

शहादा येथे माळी समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात साजरा करण्यात आला.

यावेळी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माळी समाजातील समाज बांधव व महिला मंडळ युवा युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम शहादा शहरातील क्रांती सुर्य महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या स्मारकास अभिवादन करुन भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली होती.

यावेळी भक्ती भावाने शहादा शहर व परिसर नाम घोषात दुम दुमदुमून गेले होते.
पालखी मिरवणूक सोहळा बस स्टॉप बाबा साहेब आंबेडकर चौक व मुख्य बाजारपेठेतुन लोकमान्य टिळक टाऊन हॉल येथे महाआरती करून संपन्न करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समता परिषद नंदुरबार जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघ होते. व प्रतिमेचे पूजन हिरालाल माळी, ओंकार माळी, आबा माळी, सतिश महाजन, पंडीत जाधव, डी डी महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी समाजातील विविध श्रेत्रात प्रावीण्य मिळविलेले व पदोन्नती झालेल्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला.
व तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा ही गौरव करण्यात आला व शहादा शहरातील माळी समाजातील नुतन कार्यकारिणीत निवड झालेले शहादा शहर अध्यक्षपदी जगदीश माळी, कार्याध्यक्षपदी सतिश महाजन, उपाध्यक्ष रोहन माळी, सचिव रविंद्र माळी, खजिनदार संतोष महाजन या निवड झालेल्या पदाधिकारी यांचे सुंध्दा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अथक परिश्रम दगा महाजन, मनोज वारुळे, दिनेश माळी, विपुल रोकडे, बापु माळी, महेश निझरे, ईश्वर रोकडे, योगेश वारुळे, गोपाल माळी, गोकुळ माळी, राजेंद्र माळी, अरुण माळी, रामु महाजन, विशाल माळी आदींनी केले
यावेळी कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली व यावेळी शहादा शहरात समाज एकतेचे दर्शन घडले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदलाल निझरे यांनी केले व आभार शहर अध्यक्ष जगदीश माळी यांनी मानले.
- 0
- 0
- 0
- 0





