तळोदा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सरासरी ६२.२५ मिमी पाऊस
तळोदा : तळोदा शहर व तालुक्यात मंगळवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली.(दि. १२ ऑगस्ट) सकाळी पावसाच्या झालेल्या नोदी नुसार तालुक्यात चारही मंडळनिहाय एकूण २४९ मिमी पावसाची नोंद झाली असून, दिवसाची सरासरी ६२.२५ मिमी इतकी राहिली.
तालुक्यात सर्वाधिक पाऊस तळोदा मंडळात ८३ मिमी, तर त्याखालोखाल सोमावल येथे ६९ मिमी, प्रतापपूर येथे ५४ मिमी आणि बोरद येथे ४३ मिमी पावसाची नोंद झाली.
१२ ऑगस्टपर्यंत तालुक्यातील मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद तळोदा ३९५ मिमी, बोरद ३६३ मिमी, सोमावल ४५८ मिमी आणि प्रतापपूर ४११ मिमी अशी झाली आहे. तालुक्याची एकत्रित पावसाची नोंद १,६३२ मिमी, तर सरासरी ४०८ मिमी इतकी झाली आहे.
पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, तालुक्यातील नदी-नाले व जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होत आहे.
सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा
- 0
- 0
- 0
- 0





