नंदुरबार

तळोदा येथील अरुण साळुंखे यांना “रक्त नायक डिजिटल सम्मान – 2026” या सन्मान

तळोदा येथील अरुण साळुंखे यांना “रक्त नायक डिजिटल सम्मान – 2026” या सन्मान 

नंदुरबार : स्वातंत्र्याच्या 80 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त Yuwa Kranti Sewa Foundation, बिहार तर्फे तळोदा, जि. नंदुरबार येथील समाजसेवक श्री. अरुण साळुंखे यांना “रक्त नायक डिजिटल सम्मान – 2026” ने सन्मानित करण्यात आले.

रक्तदान जागरुकता आणि समाजसेवेच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेचे राष्ट्रीय संयोजक श्री. बिमलेश कुमार भगत यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात आला.

“रक्तदान हे जीवनदान आहे. हा सन्मान माझा नसून प्रत्येक रक्तदात्याचा आहे” असे साळुंखे यांनी सांगितले.

त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *