नंदुरबार

पोलिस हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-          महाराष्ट्र पोलीस दलात दीर्घकालीन व निष्कलंक सेवेबद्दल नंदुरबार येथील हवालदार भटू धनगर यांना भारत सरकार (गृह मंत्रालय) तर्फे उत्कृष्ट व अति उत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते भटू शांतीलाल धनगर यांना सेवा पदक प्रदान करण्यात आले.


हवालदार भटू धनगर यांनी पोलीस दलात स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखा, नंदुरबार शहर पोलीस ठाणे, शहादा, येथे सेवा बजावली. सध्या महामार्ग सुरक्षा पथकात कार्यरत आहेत.
वडील शांतीलाल धनगर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अत्यंत कष्टाने हमाली काम करून मुलांना शिक्षण दिले. यापूर्वी सन 2022 मध्ये हवालदार भटू धनगर यांना पोलीस महासंचालक पदाने सन्मानित करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलात खून, दरोडे, घरफोडी अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तपास कामी यशस्वी कामगिरी बजविल्याबद्दल
अनेक बक्षिसांचे ते मानकरी ठरले आहेत. राज्य नंतर केंद्र शासनाच्या उत्कृष्ट पदक प्राप्तीबद्दल हवालदार भटू धनगर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *