नेमसुशिल ज्युनियर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न

तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या आदेशानुसार साजरा करण्यात येत असलेल्या स्वातंत्र्यदिन सप्ताहांतर्गत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि नेमसुशिल ज्युनियर कॉलेज, तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कौशल्य विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच स्किल कॉम्पिटिशनबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले व नोंदणी करण्यात आली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् हे देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. अल्पावधीत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक यशपाल केदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील परदेशी होते. सायसिंग वसावे यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी माधुरी पाटील, संदीप वसावे, चुनीलाल वळवी, बादल वसावे, सरिता नाईक, वर्षा पावरा आणि माधुरी वाघ यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखीलभाई तुरखीया, संचालिका सोनाबेन तुरखीया, उपाध्यक्ष दगेसिंग महाले, सचिव संजयभाई पटेल व संस्थासमन्वयक हर्षिलभाई तुरखीया यांनी आयोजकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
- 1
- 0
- 0
- 0





