तळोद्यात जीर्ण वीज तारा बदलण्यात यावी त्या ऐवजी केबल टाकण्याची मागणी

तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो :- तळोदा येथील भोई गल्ली येथील जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदलून त्या ऐवजी केबल टाकण्यात यावे अशी मागणी वीजवितरण कंपनी कडे निवेदनात केली आहे.

या बाबत राजे ग्रुप व भोई गल्ली येथील रहिवाशी यांनी महावितरण चे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे. कि, तळोदा शहरातील भोई गल्ली परिसरात विद्युत तारा या अतिशय जीर्ण झाल्या आहेत. या तारांमुळे लहान मोठे अपघात होत असतात. गत वर्षी देखील ह्या संदर्भात महावितरण विभागाला निवेदन सादर केले होते. परंतु ह्या निवेदनाची कुठलीही दखल संबंधित विभागाणे घेतली नाही. गणेश उत्सव अवघ्या महिना भरावर आहे. ह्याच मार्गाने शहरातील अनेक गणेश मंडळाच्या मिरवणूका मार्गस्थ होत असतात. या ठिकाणी कुठलाच अनुचित प्रकार घडू नये याची संबंधित विभागाने नोंद घेणे गरजेचे आहे. जीर्ण झालेल्या तारा कधीही तुटून अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी ही महावितरण कंपनी ची असेल असे निवेदनात म्हटले आहे.
सदर या निवेदनावर राहुल शिवदे, ललीत ढोले, मयूर सोनवणे, आकाश ढोले, जालंधर भोई, प्रवीण शिवदे, रघुनाथ जावरे, भूषण जावरे, कुंदन शिवदे, अक्षय नुकते, मयूर साठे, बंटी शिवदे, रवींद्र कुंभार, अक्षय सोनवणे, आदी सह शेकडो रहिवाश्यांच्या सह्या आहेत.
- 0
- 0
- 0
- 0





