
नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूल, तळोदा येथे विद्यार्थी प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न
तळोदा : नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूल, तळोदा येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थी प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शाळा प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना शैक्षणिक साहित्य व शुभेच्छापत्र देण्यात आले. झाडे वाचवाप्राणी वाचवा पाणी वाचवा जीवन वाचवा असा महत्वपूर्ण संदेश देत शाळेचा प्रवेशोत्सव हा करण्यात आला आज मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे व प्राणी आपले नैसर्गिक जे निवासस्थान आहे ते गमावत आहे आपण लावलेले प्रत्येक झाडाला हे पुढील पिढीसाठी दिलेली अमूल्य भेट आहे म्हणून विद्या मंदिरात देखील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण हे करण्यात आले झाडे लावून निसर्गाचे व जनावरांचे देखील संरक्षण करू असा संकल्प आज प्रवेशोत्सवाच्या दिवशी घेण्यात आलेशाळेचे मुख्याध्यापक पिढी शिंपी व कल्याणी वडाळकर यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व पटवून दिले. तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
प्रवेश उत्सवानिमित्त शाळा परिसर आकर्षक फलक, फुगे व रांगोळीने सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नव्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी आणिव पर्यावरण संतुलन राखले जावे म्हणून झाड लावून प्रवेशोत्सव करण्यात आला उपक्रमामागील हेतू आहे याउपक्रमाचे कौतुक शाळेचे अध्यक्ष निखिल तुरखीया उपाध्यक्ष महाले आप्पा सचिव संजू भाई पटेल संचालिका सोनातूरकिया समन्वय हर्षिल तुरखीया यांनी विशेष कौतुक केलेमुख्य उद्देश असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले.
या प्रसंगी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धरती पाटील अक्षता बारी योगिता शिंदे दिपाली पाटील सुमित्रा तांबोळी मनीषा साबळे सोनाली बांदकर ज्योती पाडवी भावना शिंपी बादल बरवी रोहित यादव व मोहन पाटील गणेश पाडवी ईश्वरचित्रकथे इत्यादी शिक्षकेतर कर्मचारीसर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिभा बैसाणे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
- 0
- 0
- 0
- 0





