Politics नंदुरबार नंदुरबार राजकारण

शहाद्याचे माजी भाजपा शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

शहाद्याचे माजी भाजपा शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
तळोदा येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात शहादा शहराचे भाजपाचे माजी शहराध्यक्ष यशवंत अण्णा चौधरी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
नंदुरबार जिल्ह्याचे खासदार गोवाल पाडवी, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते ॲड के. सी. पाडवी, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते ॲड पद्माकर वळवी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक पटेल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकी पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यशवंत अण्णा चौधरी यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे शहादा शहरातील राजकीय घडामोडींना वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
मेळाव्यात पक्ष संघटन, आगामी राजकीय वाटचाल आणि स्थानिक पातळीवरील विविध विषयांवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *