तळोदा श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिर उत्साहात
तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- तळोदा येथील श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळातर्फे येथील संत सावता माळी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिरात एकूण १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये ३० महिला व ७५ पुरुष रक्तदात्यांचा समावेश होता. रक्तदान करून नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान जपत गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रक्त संकलन नवजीवन ब्लड बँक धुळे डॉ. सुनील चौधरी, टेक्निशन दिलीप जाधव, प्रवीण महाजन, समुपदेशक विशाल साळुंके, अटेंडंट पांडुरंग गवळी यांनी केले रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल मंडळाच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.
- 0
- 0
- 0
- 0






